prabodhini news logo
Home चंद्रपूर अखेर त्या ब्यानरला जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपुरे भिम आर्मी यांनी काढण्यास भाग पाडले…

अखेर त्या ब्यानरला जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपुरे भिम आर्मी यांनी काढण्यास भाग पाडले…

0
849

PRANIT TODE CHANDRAPUR – दुर्गापूर पोलीस स्टेशनं हद्दीत येणाऱ्या रुपेंद्र बिग बाजारच्या अगदी समोरा समोर किशोर लाड या बिनडोक व्यक्तीने एकाच ब्यानर वरती डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पर ब्यानर लावले.
सकाळी नियमित प्रमाणे चौकात जात असताना सुरेंद्रभाऊ रायपूरे यांना ते ब्यानर झडकले आणि त्यांची पायातील आग मस्तकात गेली. त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी त्यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनं इथे संपर्क साधला, त्यावर शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन यांनी सुरेंद्र रायपुरे यांस विनंती केली आणि स्वतः दुर्गापूर पोलीस यांनी ते ब्यानर काढायला लावले.
यावर सुरेंद्रभाऊ रायपुरे यांनी दुर्गापूर पोलीस प्रशासन यांना धन्यवाद देत प्रतिक्रिया दिली की भिम आर्मी अश्या प्रकारे महापुरुषांचा अवमान कदापि सहन करून घेणार नाही, भविष्यात जर कुणी अशी चूक परत केली तर त्यांना कायदेशीर रित्या चांगला धडा शिकवू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here