मध्यप्रदेशातील
महु गाव
जन्मले तिथे
भीमराव
समज येऊ
लागली जशी
वाटले तयांना
ही व्यवस्था कशी
बुद्धीवंत तरीही
हीन वागणूक
लागली तयांना तव
ज्ञानाची भुक
तासनतास मग
पुस्तकात रमले
अनेक चळवळीत
भीमराया गुंतले
लठ्ठ पगाराच्या
केला नोकरीचा त्याग
फुलवायची होती तया
समतेची बाग
मंत्रीपदाचा
राजीनामा दिला
दिले महत्व
स्त्री उद्धाराला
कुठे न विकला
स्वाभिमान
भारताला दिले
संविधान
दलित उद्धारा
देह झिजवला
म्हणूनच समाजा
नवा जन्म मिळाला
ज्ञानसूर्याचे तेज
चहुकडे पसरले
पिढ्यांनपिढ्या
दु:ख विसरले
तुमच्या स्मृती सदा
देतात प्रेरणा
स्विकारा भीमराया
सर्वांच्या अभिवादना
अनिता कांबळे, यवतमाळ

