विचारवंत क्रांतिकारक
सत्यशोधक समाजसुधारक
समाजाचे संस्थापक
महात्मा पदविचे मानकरी
जन्म गोविंदराव चिमणाबाई
ह्या दांपत्याच्या पोटी झाला
नऊ महिन्याचे असतांना
त्याच्या आईचे निधन
वडिलांनी हाताचा पाळणा केला
बालविधवा बहिण सगुणा
संस्कारांची पेरणी केली
बालवयातच समजले
फुलेनां बालवयातच समजले
अस्पृश्य व स्त्रीयांना मुळीच
शिक्षणाचा अधिकार नाही
या गोष्टीची जाणिव झाली
शुद्र व स्त्रीया शिक्षण कार्यासाठी
देह झिजवला
ज्ञानाचे दरवाजे खुले करायचे
भिडेवाड्यात पहिली
शाळा सुरू केली
स्त्रीया इतक्या अशिक्षित
स्वंयपाक खोलीतुन बाहेर
येत नसत स्रियांना शुद्रांना
वागणुक दिली जाई
न खचता कार्य सुरु केले
जुनाट विचारांच्या धर्म
वांद्यानी विरोध केला
विधवाच्या केशवपनाची
चाल बंद केली
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त्त गेले
वित्त्तविना शुद्र खचले
अनर्थ एका अविद्येने केले
विद्या नसेल बुध्दिचे पोषण नाही
योग्य अयोग्य हे कळणार नाही
सौ. सुनिता कोठावदे
पिंपळनेर

