प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

0
70

नका म्हणू मज महात्मा
नका म्हणू मज क्रांतीसुर्य
लायकी नाही हो तुमची
का शब्द दवडता व्यर्थ…||ध्रु.||

काय उपयोग झाला
माझ्या स्त्री शिक्षणाचा
हुंड्यासाठी मात्र तुम्ही
पेटविला देह सावित्रीचा…
नका म्हणू मज….||01||

काय उपयोग झाला
माझ्या स्त्री स्वातंत्र्याचा
बलात्कारी लांडगे रोज
बाजार मांडती द्रौपदीचा.
नका म्हणू मज….||02||

काय उपयोग झाला
मम अस्पृश्य निवारणाचा
द्वेष वाढला जातीचा
वाद पेटला आरक्षणाचा
नका म्हणू मज….||03||

काय उपयोग झाला
मी दिलेल्या विचारांचा
“टिळक” की “फुले” श्रेष्ठ
तुझी फक्त पगडीची चर्चा
नका म्हणू मज….||04||

काय उपयोग झाला
माझ्या सत्यशोधनाचा
सत्य हिंडते दारोदारी
विजय “श्रीमंत” असत्याचा
नका म्हणू मज….||05||

नका करू साजरी
जयंती माझी “लोक” हो
पेटेन पुन्हा नव्याने
द्या मज “सावित्री” एक हो…
द्या मज “सावित्री” एक हो…
नका म्हणू मज….||06||

कवी: अमोल निरगुडे
डोंबिवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here