भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।१।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।२।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे गिरवत होता।।३।।
छोट्याशा भीमाने त्या
ज्ञानाचे केले मंथन
बुद्धीच्या जोरावर त्यांनी
जग हलविले दनादन।।४।।
असा तो कायदे पंडित
झाला घटनेचा शिल्पकार
भारताची राज्यघटना लिहून
दिला मानवतेलाच आधार।।५।।
अशा या महान नेत्याला
चला करू त्रिवार वंदन
मानवतेचा पिकवून मळा
जीवन घडविले नंदनवन।।६।।
विश्वरत्न बाबासाहेब
खरोखर महान झाले
जगाच्या उद्धारासाठी
त्यांनी महान कार्य केले।।७।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

