prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भारतीय संविधान

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भारतीय संविधान

0
133

आठवण येते, आम्हा
ज्ञानी आंबेडकरांची
संविधान लिहिलेल्या
गुणी, हो शिल्पकाराची!

ज्यांनी दिला, समाजात
दीन- दलितांना आधार …
नाही घेतली, कधीच
शून्यातून रे माघार !

आंबेडकर म्हणजे,
लोकशाहीची ती शान
ज्यांनी उंचावली, आहे
संविधानातून मान !

धर्मनिरपेक्षतेचे
भान, नेहमी ठेवून
दिली करून हक्काची,
कर्तव्य, न्यायाची जाणं!

जीवनात त्या स्वतःच्या
हाल, अपेष्टा करुन ….
दीन-दुबळ्यां‌ , लोकांची
दिली, उणीव भरून !

दिली ती, समानतेची
नवी क्रांती घडवून
नाही, कुणाला ठेवले
हक्कासाठी अडवून!

दिला ज्ञानाचा प्रकाश
प्रगतीची एक, आसं
आणला तो घडवून
एक, क्रांती इतिहास !

क्रांती पाहता अपार..…
तुम्ही, महामानवाची
जगा भासली उणीव ,
सदा लोकांना तयाची !

कायद्याचे ,हक्क,न्याय,
संविधान ग लिहून
जगामध्ये आहे ,त्याचा
कायदा आणि कानून!

सर्वांनाच मिळवून
दिले हक्क ते समान ….
आहे हे आमचे खरे
भारतीय संविधान!

कवयित्री अलका बाळू भवारी
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here