किती गुणगाण करावे
आपले जोतिबा फुले
शिकवून सावित्री माईला
स्त्री शिक्षण केले खुले…
आपल्या सोबतीने माईने
स्त्रीयांना शिक्षण दिले
शिक्षणाचे महत्त्व पटताच
स्त्रीयांचे जीवन बदलून गेले….
समाजाच्या उत्थानासाठी
विरोधकांचा त्रास झेलले
बाल विवाह बंद करून
विधवांचे उत्थान केले…..
अनिष्ट रुढी व परंपरा
आपण काढल्या मोडून
अंधश्रद्धा निर्मूलन केले
सत्यशोधक विचार पेरून….
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा
आपणामूळे आम्हा सन्मान
जयंती दिनानिमित्त आज
आपणास कोटी कोटी वंदन….
लोपामुद्रा शहारे
नागपूर मानेवाडा

