बोलू लागला भिडेवाडा
शिक मुली शिक तू
धर हातात लेखणी
वर्षानुवर्षे धरलीस जशी
हातात तू फुंकणी
उघडले स्री शिक्षणाचे दार
सुरू जाहला ज्ञानाचा जागर
सोसून सामाजिक विरोध
स्रीशिक्षणाची रोवली मुहूर्तमेढ
धन्य महात्मा ज्योतीबा फुले
त्याच्या क्रांतीने केला स्त्रियांचा उद्धार
शिकवून सावित्री माईनां
उघडले मुलींसाठी ज्ञानाचे महाद्वार
भिडे वाड्यात लावलेले स्री शिक्षणाचे रोप
एक वर्षात बंद पडले
तरी दिसीमासी देशभरात पसरले
स्री शिक्षणाचे वारे घुमले
शिक्षणाचा पकडताच हात
ज्ञानभांडार खुले झाले
जगतजननी माता ती
तिच्या आयुष्याचे सोने झाले
स्री उद्धारक महात्मा फुले
जयजयकार करू तुमच्या क्रांतीचा
रोप लावले स्री शिक्षणाचे
उद्धार झाला स्री जन्माचा
गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

