
मोगऱ्याचा गजरा सुंदर सुवास
आकर्षणाचा हा गंध परिमळ
केसात माळला केशालंकाराची
झाली तृप्त आशा मनाची तळमळ
कुंदाही दिसतो मोहक
माळताना केसात सुटसुटीत
फुलांना एकत्र करून गुंफले
जणू दिसतो शोभून टवटवीत
जाई जुईच्या फुलांची
जणू बांधला गजरा
वाटे ग बाई छान सुवास
अन् केसात लावाया साजरा
चाफा पिवळा सुवासिक
देठ हिरवा घेऊन बनविला
गजरा छोटासा अंबाड्याला
लाविला मोहून घेतले साजनाला
रंजना भैसारे, नागपूर















