जातिभेद संपवण्यासाठी
झाला जन्म भिमरावांचा
त्रास दिला उच्चभ्रूंनी त्यांस
भीमा पुत्र भारत भूमीचा
भीमरावांच्या जन्मामुळे
गरीब जनतेस
मार्ग दाखवलास तुम्ही
अन्यायाविरुद्ध लढण्यास
उच्च शिक्षण घेण्यास
गेले तुम्ही परदेशी
तिथेच न राहता, जनतेसाठी
परत आला मायदेशी
देशाला दिले संविधान तुम्ही
आहेस तुम्ही कायदे पंडित
कायदामंत्री झाले तुम्ही
स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात
१४ एप्रिल १८९१
जन्मदिवस तुमचा
तुमच्या जन्मामुळे
उद्धार झाला भारताचा
मिळाला भारतास थोर
ज्ञानी आणि कायदे पंडित
होते तुम्ही घटनेचे शिल्पकार
अमूलाग्र बदल केला कायद्यात
रेखा डायस
गोवा

