हनुमान जयंतीनिमित्त चिखली येथील हनुमान मंदिर सभागृहाचे लोकार्पण

0
104

मा. खा. डॉ. अशोक नेते यांच्या शुभहस्ते संपन्न

मा.खा.डॉ. अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कामाचे लोकार्पण.

सावली दिनांक: १२ एप्रिल २०२५ – तालुक्यातील चिखली येथे पवनपुत्र श्री. हनुमान जयंतीच्या पावन दिनी चिखली गावासाठी एक ऐतिहासिक व भक्तिभावाने भरलेला क्षण ठरला. येथील हनुमान मंदिरासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पण माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या ७ लाख रुपयांच्या अर्थसाहाय्यामुळे हे काम पूर्णत्वास गेले.

या कार्यक्रमात बोलताना मा. खा. डॉ. अशोक नेते म्हणाले, “सन १९९० पासून उघड्यावर असलेल्या या मंदिरासाठी सभागृहाची अत्यंत गरज होती. दोन वर्षांपूर्वी, मान. नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत या गावाला भेट दिली होती. त्यावेळी दिलेले वचन आज पूर्ण करताना अत्यंत समाधान वाटते.”

याचवेळी त्यांनी पुढे बोलत चिखली गावाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेत मी माझ्या प्रयत्नाने “खनिज विकास निधीतून १० लाख रुपयांचा रस्ता मंजूर केला आहे. याआधीही २५ लाख रुपयांची कामे या निधीतून झाली आहेत. याशिवाय, भाजप नेत्या प्रतिभा बोबाटे यांनी माता माऊली मंदिरासाठी नवीन सभागृहाची मागणी केली असून यासाठी ही माझा विशेषतः प्रयत्न राहिलच अशी ग्वाही त्यांनी दिली.

यासोबतच मा.खा.डॉ. अशोक नेते यांनी लोकसभेतील दिलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांचे आभार व्यक्त करत माझा जरी पराभव झाला असेल तरिपण आपल्या गावातील अडीअडचणी समजून घेत विकासाच्या कामाला गती राहील.असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी मा.खा.डॉ. अशोक नेते हे डॉक्टरेट पदवीने सन्मानित झाल्याने त्यांचे गावकऱ्यांनी सत्कार केला.

कार्यक्रमास जिल्हा सचिव तथा भाजपा नेत्या प्रतिभा बोबाटे, ब्रम्हपुरीचे बीडीओ रविंद्र घुबडे, माजी सरपंच सविता करोडकर, पो.पा. रमेश बोबाटे, आबाजी बोबाटे, पुरुषोत्तम घुबडे, लोमाजी बानबले, मुखरु राऊत, शालीक भोपये, पांडुरंग मेश्राम, गजानन मारबते, विकास हूलके, विकास महाजनवार, पंढरी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील महिला, युवावर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या निमित्ताने हनुमान मंदिरात धार्मिक विधी, महाआरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. ग्रामस्थांनी मनःपूर्वक आनंद व्यक्त करत मा.खा. डॉ. अशोक नेते यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here