देवाचा देव तो, त्यानं शिक्षण घेतले परदेशी l
देव होऊन परतला तो मायदेशी ll
संधी मिळून सुद्धा, नाही केली त्यांनी स्वतःसाठी कमाई l
धन्य ती जन्म देणारी भिमाची रमाई ll
दिन दलितांचा कैवारी, केला त्याने जातीभेदाचा किमा l
ज्ञानरूपी सागराने अजरा मर झाला तो भीमा ll
त्यावेळी मिटवली तहान चवदार तळ्याच्या पाण्याने |
आज देहभान हरपून जाते आमचे, ऐकुनी त्यांच्यावर आधारित गाण्याने ||
कामगिरीने यांच्या मोठ्या दिमाखात फडकतो तो झेंडा निळा l
नतमस्तक व्हावे त्यास, कपाळी लावून त्याचा टिळा ll
आयुष्य मोजले त्याने समाज हितासाठी, नव्हतं त्याच्या मनात काही खोटं l
राज्यघटनेचा शिल्पकार तो, नाव त्याचं फार मोठं ll
करून अभ्यास परिस्थितीचा, ओढली त्याने कायद्याची लकीर l
नव्हती त्याला कधी स्वतःच्या आयुष्याची फिकीर ll
दाखवले जनतेला त्याने यशस्वी वाटेकडे बोट l
भरले अर्ध्यावरी राहिलेल्यांचे दिन दलितांचे पोट ll
परदेशी शिक्षण त्यांचे ठरले सर्व भारतीयांच्या फायद्याचे l
संविधान लिहिले त्यांनी देशाच्या कायद्याचे ll
नाश केला त्यांनी अज्ञानी जातीभेदाचा सर्व l
घडवले दिनदलितांच्या जीवनाचे नवे पर्व ll
दत्तात्रय शिंदे, सांगली

