भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली येथे १४ एप्रिल रोजी नेहरु युवा केंद्रामार्फत कार्यक्रमाचे आयोजन

0
59

गडचिरोली दि .१२: – केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल २०२५ रोजी साजरी करण्यात येणार आहे. याअंतर्गत पूर्वी जाहीर करण्यात आलेली “जयभीम पदयात्रा” दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, शासनाच्या ११ एप्रिल २०२५ रोजी प्राप्त परिपत्रकानुसार कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
सदर बदलानुसार, १४ एप्रिल २०२५ रोजी नेहरु युवा केंद्र, गडचिरोलीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विश्रामगृह जवळ, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्र, गडचिरोली यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here