तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक १३ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात अव्वल स्थानी असलेल्या साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र आयोजित करण्यात आले.
भीमा तुझ्या जन्मामुळे या विषयाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या उपक्रम विषयावर राज्यातील तसेच राज्याबाहेर एकूण १५८ साहित्यिकांनी सहभाग नोंदवून आपली सुंदर कविता तसेच लेख लिहिला.
यामध्ये अनेक मान्यवर साहित्यिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रकाश टाकला आहे.
राज्यात अव्वल स्थानी असलेल्या या समूहात दररोज अनेक विषयावर उपक्रम विषय आयोजित केले जातात.
सहभागी सर्व मान्यवर साहित्यिकांचे समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर नागपूर,समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके आरमोरी जिल्हा गडचिरोली,समूह निरिक्षिका निता मनिष बागुल नाशिक, समूह कार्याध्यक्ष मधुकर गोपनारायण नागपूर,समूह प्रशासक सीताराम नरके पुणे,समूह मार्गदर्शक डॉ.हरिश्चंद्र धिवार मुंबई आदींनी अभिनंदन आणि पुढील साहित्य वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

