prabodhini news logo
Home ठळक बातम्या तथागत विद्यालय केसलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी

तथागत विद्यालय केसलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी

0
122

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
9665175674

भंडारा – पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे 14 एप्रिल 2025 ला विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली.

बाबासाहेबांचे अनेक शैक्षणिक विचार बघतात. त्यांच्या कार्याला उजाळा घेताना विद्यालयात मुलांसाठी *सामान्य ज्ञान स्पर्धा* तसेच त्यांच्या जीवनावर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.गीत गायन स्पर्धेत कु.आर्या गजभिये,कु.प्रेषिता चव्हाण,कु.वेदांती गाडेकर ह्या विद्यार्थिनींनी उत्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व मार्गदर्शन करतांना महामानवाचे शैक्षणिक विचार अंगीकारावे असे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. सहाय्यक शिक्षिका कु.सुषमा गजभिये यांनी महामानवांनी केलेल्या कार्याचा उजाळा सांगून स्त्री शिक्षणाचे महत्त्व कसे होते आणि बाबासाहेबांनी कसे पटवून दिले हे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन समाजाला योग्य मार्ग दाखविला तसेच आपणही ते अंगीकारावे असे सहाय्यक शिक्षक अविन दिघीरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रदीप गोंडाने यांनी केले. तर आभार प्रमोद गाडेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला रोहित फेंडर, गणेश मरस्कोले, भोला सयाम यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here