स्पर्धा- स्पर्धा- स्पर्धा राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा
काव्यलेखन स्पर्धा – 03
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – १४ एप्रिल १८९१ रोजी सोनेरी पहाट उजळता क्रांती सुर्याचा जन्म झाला. अखेर इतिहासाच्या पानात नोंद झाली ती म्हणजे परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्व भूषण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जन्म दिवस…! हा दिवस म्हणजे आज १३४ वा जयंती महोत्सव होय.अगदी जल्लोषात धूमधडाक्यात साऱ्या विश्वभर साजरी केला जात आहे. दलितांचे कैवारी,उद्धारकर्ते, संविधानातून सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देणारे, स्त्रीयांना हक्क मिळवून देणारे, तसेच न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या एकसूत्री तत्वावर मूलभूत अधिकार देऊन अखेर भारतीय संविधानाचे निर्माते ठरले. अशा या महामानवाची जयंती आपण साजरी करत असताना ‘राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा’ घेण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन नवोदित ज्येष्ठ कवी कवयित्री, साहित्यिक, लेखक यांनी राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत भाग घेवून काव्य स्वरूपात अभिवादन करावे.हिच खरी आदरांजली ठरेल. अभिवादनपर या कविता संग्रहित करून विशेष गौरवगाथा डॉ. बाबासाहेबांची…!काव्य संग्रह छापला जाईल. याची सर्व कविनी नोंद घ्या.
विषय:- गौरवगाथा डॉ.बाबासाहेबांची..!
परीक्षक :-
स्पर्धेचा कालावधी
दिनांक -१४ एप्रिल ते १५ एप्रिल २०२५
सकाळी १० ते १२ रात्री वाजेपर्यंत २ दिवस ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
दिलेल्या विषयावर काव्य लिहून स्पर्धेत सहभागी व्हा…!
नियम
कवितेखाली स्वतःचे पूर्ण नाव लिहावे.
समूहाचे पूर्ण नाव अपेक्षित
विषय. दिलेली ओळ कवितेत यायला हवी.
कवितेला योग्य शीर्षक द्यावे.
योग्य यमका बरोबर कविता लयबध्द असावी.
कविता ही शुद्धलेखन पूर्ण असावी.
कविता कोणत्याही काव्य प्रकारातील चालेल .
स्पर्धा सुरू असताना इतर पोस्ट टाळाव्यात
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे लेखन करू नये.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, भावस्पर्शी, लक्षवेधी असे सन्मानपत्र मिळणार आहेत.
आयोजक प्रमुख सल्लागार मा. डॉ. विनोद जाधव, अध्यक्ष मा.नरेंद्र अनंत पवार, उपाध्यक्षा मा. माला मेश्राम, सचिव मा. अनिल सावंत, सहसचिव मा. सूर्यकांत कांबळे, कार्यध्यक्ष मा. मनोज गायकवाड, मार्गदर्शिका मा. प्रांजली काळबेंडे मार्गदर्शक मा. मधुकर गोपनारायण, समीक्षक प्रा. नानाजी रामटेके, निरीक्षक मा. रघुनाथ दहिवडे, संघटक, मा. संतोष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे..
आपण आपल्या कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र या समूहात वरती किंवा 9773461379या मोबाईल नंबर वर पाठवाव्यात.
ही विनंती….

