सचिन ठक तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर येथे इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक मान. गीता चौधरी विस्तार अधिकारी शिक्षण या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. सुनील मासिरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री अतुल पोहाणे केंद्रप्रमुख केंद्र मारडा हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सरपंच मान. मंजुषा ताई मत्ते,ग्राम पंचायत उपसरपंच संजय गणफाडे, मान. संगीता मत्ते, प्रियंका शेलवटे, चंदा नांदेकर, घुंगरूडकर मॅडम ग्रामसेवक उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मान. अर्चना उलमाले, मान. रेखाराम मत्ते, मान. स्वाती ताई भोयर, मान. कविता मोडक, मान. निषाद ताई, हे उपस्थित होते.
तंटामुक्ती अध्यक्ष मान. धर्मपाल कांबळे तंटामुक्त समिती सिदूर हे उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
सर्वप्रथम उद्घाटक व उपस्थित पाहुण्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले तसेच सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सुद्धा स्वागत करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. दुधे विषय शिक्षक यांनी केले शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगतातून शालेय जीवनातील गोष्टींचा उजाळा सर्वांसमोर मांडला. काही विद्यार्थ्यांच्या मनोगत आतून भावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे अतिथी श्री पोहाणे सर यांनी मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना विविध यशाच्या वाटा व त्यासाठी लागणारी एकाग्रता याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय माहूरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुण व व मुलांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय चौधरी मॅडम यांनी मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन परिश्रम करत रहा यश नक्कीच मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ मासीरकर यांनी सुद्धा मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मोठयाचा व गुरुजनाचा आदर ठेऊन योग्य नागरिक व्हा असे सांगितले. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वॉल वॉच व महापुरुषांचे फोटो भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता सातवीतील कुमारी स्वरा बाविस्कर हिने तर आभार प्रदर्शन राजवीर नगराळे यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुग्रास भोजन देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री गावंडे सर व श्री अविनाश जुमडे सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य इयत्ता 5 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

