प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पैजण

0
144

छकुलीच्या पायातील
वाजतात पैंजण
पैजण घालुन ती
फिरते घर अंगण

बोबडे बोल तिचे
सोबत छुमछुम पैजण
डोळे भरून पाहते
मी हे आनंदी क्षण

मी म्हणते तिला तू
नाही का ग थकली?
कर ना थोडा आराम
तुझी बाहुली तर झोपली

नको नको म्हणत
ती गाण्यावर नाचते
पैंजण कसे वाजतात
ती स्वत:ही बघते

छकुलीसाठी चांदीची
पैंजण जोडी
तिला छान म्हटले की
लाजते ती थोडी

छकुली आमची
लाडकी सर्वांची
शोभुन दिसते फार
तिला जोडी पैंजणाची

कवयित्री अनिता कांबळे
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here