भऊर परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीवर शेतकऱ्यांचा भर

0
199

सुरेखा गांगुर्डे
महिला तालुका प्रतिनिधी,
प्रबोधिनी न्युज, देवळा

सध्या कसमादे भागातील कांदा उत्पादक उन्हाळ कांदा काढणी व साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे.बंपर उत्पादन मिळेल अशी आशा असतांना अवकाळी पाऊस,वातावरणातील बदल या समस्सेने कांद्याला मोठा फटका बसणार आहे. वीस टक्के उत्पादन शुल्क कमी केल्याने भाव वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कुठली सुधारणा न झाल्याने सध्या कांद्याला मिळणारा अल्पसा बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांदा साठवणूकीवर भर देत आहेत.
या वर्षी चांगला पाऊस व उन्हाळ कांद्याला चांगला भावामुळे व विक्रमी लागवडीमुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधेल असा कयास होता. मात्र कांदा लागवड लेट झाल्यामुळे गळीताच्या वेळी उष्णता आहे मुळे कांद्याला करपा आला तसेच सध्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल समस्सेने कांद्याला मोठा फटका बसला आहे.त्यामुळे उत्पादन घटणार असल्याने चित्र आहे.
त्याच बरोबर मार्चच्या शेवटी कांदा उत्पादन शुल्क कमी झाल्याने एक एप्रिल पासून भावाचे दारणा होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र कांद्याचा भावा सुधारणा न झाल्याने शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीवर जोर देऊ लागला आहे.
मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या भऊर सह खामखेडा सावकी, विठेवाडी, पीळकोस,बगडू,भादवण, विसापूर परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
या वर्षी रोपाच्या टंचाईने कांदा लागवड उशिरा झाली. त्यामुळे उन्हाळी कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटल्याने कांदा पिकास फटका बसनार आहे.
सरासरी चांगला बाजारभाव असल्याने या वर्षी विक्रमी लागवड होऊनही कांद्याच्या उत्पादनात सर्वत्र घट होणार आहे.
गिरणा परिसरातील भऊर, बगडू, खामखेडा भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते.दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करत होता. मात्र यावर्षी उत्पादनातील घट,सध्या मिळत असलेला अल्पसा बाजार भाव या गोष्ठीचा विचार करत शेतकरी वर्गाने साठवणुक करण्यास भर दिली आहे.

प्रतिक्रिया
सध्या अल्पसा बाजारभाव पावसाचे वातावरण यामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत.वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दोन पैसा मिळेल अशी आशा असल्याने शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत.

भाऊसाहेब पवार,कांदा उत्पादक शेतकरी, भऊर
फोटो ओळ-, भऊर परिसरात कांदा साठवणूक करतांना शेतकरी वर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here