इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरचा उपक्रम – ज्ञानार्चना अपंग संस्थेसाठी कच्चा माल व आर्थिक मदत

0
117

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे ज्ञानार्चना अपंग संस्था येथे चालणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे केला जात आहे. वर्षभरापासून संस्थेस विविध वस्तू जसे की रद्दी, जुन्या साड्या व इतर आवश्यक कच्चा माल नियमित पुरवला जात आहे.

याच उपक्रमांतर्गत यंदा क्लबतर्फे संस्थेला अडीच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या रकमेचा उपयोग संस्थेत चालणाऱ्या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी करण्यात आला आहे.

या सामाजिक उपक्रमात क्लबच्या अध्यक्ष सुचिता जेऊरकर, सचिव पल्लवी तेलंग व कोषाध्यक्ष अर्चना उचाके यांची विशेष सहभागिता होती.
हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, अपंग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक नवी दिशा देणारा ठरत आहे.

Inner Wheel Club of Chandrapur, District 303 ने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here