प्रा.डॉ.राजकुमार मुसणे नाट्यसमीक्षा पुरस्काराने सन्मानित

0
49

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेच्या वतीने नुकताच प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कारामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी रंगभूमीचे अभ्यासक, नाट्यकलावंत, समीक्षक प्रा. डॉ. राजकुमार मुसणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या शुभहस्ते चित्रपटनिर्माते भाऊसाहेब भोईर, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, सिने कलावंत देवेंद्र दोडके, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर , नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, रंगकर्मी प्रमोद भुसारी, श्री . पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत नाट्य समीक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनवैभव शिक्षण मंडळाच्या आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात कार्यरत प्रा. राजकुमार मुसणे यांनी ‘झाडीपट्टी रंगभूमी: आकलन आणि आस्वाद’, ‘झाडीपट्टी रंगभूमी :चिंतन आणि चिकित्सा’, ‘तिफण: झाडीपट्टी रंगभूमी विशेषांक’ आदी ग्रंथांचे संपादन व झाडीपट्टीतील विविध आयामावर पन्नास पेक्षाही अधिक समीक्षालेखाचे लेखन केले आहे. स्वप्न एका कळीचे, गजर माणुसकीचा, होय! मुलगी आहे मला ‘,या एकांकिकाचे लेखन केले असून त्याचे महाराष्ट्रभर शेकडो यशस्वी प्रयोग झाले आहेत. नाट्यकलावंत राजकुमार मुसणे यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या’ पेटला सारा गाव ‘, ‘बहरला प्रीतीचा पारिजात’, ‘नवरा माझ्या मुठीत ग,’ ‘धरती आबा बिरसा मुंडा’, ‘पापी पुत्र’आदी नाटकामध्ये त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. झाडीपट्टीतील दिवाळीपासून होळीपर्यंतच्या हंगामात विविध चाळीस नाट्यप्रयोगाचे समीक्षा लेखन प्रकाशित केले आहे. त्यांच्या एकूण वैविध्यपूर्ण लेखनामुळे विदर्भाच्या गौरवशाली सांस्कृतिक इतिहासाला अभिजित ज्ञानाला परिश्रमपूर्वक वाढवल्याबद्दल रंगभूमीच्या आदर बाळगत निष्ठेने नाट्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानाचिन्ह , रोख रक्कम, मानपत्रासह नाट्यसमीक्षा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here