१७ पैकी १४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी; २ अपक्षांनीही दिला पाठींबा
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. त्यामध्ये काॅंग्रेस पक्ष प्रणित शेतकरी परिवर्तन आघाडीने १७ पैकी १४ जागांवर विजय संपादन केले होते. तर भाजपच्या शेतकरी जनता परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. व २ अपक्ष उमेदवार देखील निवडुन आले होते. मात्र आता या २ अपक्ष नवनिर्वाचित संचालकांनी काॅंग्रेस प्रणित पॅनेलला पाठींबा जाहीर केला असुन काॅंग्रेस प्रणित पॅनेलचे संख्याबळ १६ झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, काॅंग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या सर्व १६ नवनिर्वाचित संचालकांचा शाल देऊन सत्कार केला आहे.
यामध्ये सेवा सहकारी संस्था क्षेत्रातील सर्वसाधारण गटातून शेतकरी परिवर्तन आघाडीचे अनिल स्वामी, नितीन गोहने, नामदेव ननावरे, राकेश गडमवार, हिवराज शेरकी, राजू ठाकरे, नरेश सुरमवार, इतर मागास प्रवर्ग गटातील निखिल नरेश सुरमवार, विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातील प्रमोद दाजगाये, महिला आरक्षण गटातून कांताबाई बोरकुटे, नंदाताई आभारे निवडून आले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर, सुनिल बोमनवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अरविंद भैसारे विजयी झाले. व्यापारी गटातून प्रशांत चिटनूरवार तर मापारी हमाल गटातून मारोती सहारे ह्या संचालकांचा समावेश आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदिप गडमवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार यांनी अभिनंदन केले.

