प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – तंत्रज्ञानाचे युग आले, चांगल्या बरोबर वाईटही आले, काहींची हातची कामे गेली, तर कित्येक जण रस्त्यावर आले.मशिनीमुळे पटापट कामे होऊ लागली.माणसांची दोन दिवसांची कामे एका तासात होऊ लागली मालकांना परवडेल,अशा पद्धतीने मशिनरी आल्या आणि कामाचा पसारा काही क्षणात कमी झाला.त्याबरोबर सांडपाण्यामुळे डासांची संख्या वाढत गेली, निरनिराळे आजार आले,माणसांना माणसांची गरज उरली नाही आणि कोरोना सारख्या रोगाने तर झटपट लोकसंख्या कमी झाली. त्यावर इलाज शोधता शोधता कोणी श्रीमंत तर कोणी भिकारी झाले,असे सगळे परीणाम या तंत्रज्ञानाच्या युगाचे केले.
त्यामध्ये लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आला , शिक्षणाबरोबरच मुलांना नवनवीन गेम खेळण्याचा छंद लागला.अहो हल्ली तर मुलांना जेवण्यासाठी सुद्धा माता मोबाईल लावतात तेव्हा कुठे मुलं पोटभर जेवतात.पण त्याचा दुष्परिणाम या शिकलेल्या मातांना माहीत नाही का,मुलांची दृष्टी अधु होईल,कानाने बहीरे होतील कदाचित त्यांच्या मेंदुवर परीणाम होऊन ते वेडे देखील होऊ शकतात,कधी कळणार या आयांना, जीवनात तुम्ही काय कमावले जे काही करता ते आपल्या मुलाबाळांसाठीच ना, शेवटी काय मिळवाल तुम्ही ही फार मोठी भेडसावणारी समस्या आज समाजात नव्हे प्रत्येक घरात दिसत आहे त्यामुळे मातांनो वेळीच जाग्या व्हा,सजग व्हा,तुमची मुलं हीच देशाची संपत्ती आहे,त्यांना जिजाऊ सारखे घडवा, आणि देशाचा सुजाण नागरिक बनवा.
लेखिका सौ. सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे

