डॉ. सुखदेव काटकर तालुका प्रबोधिनी न्युज तुमसर – तुमसर शहर दिनांक 22/4/2025 ला कश्मीरच्या पहलगाम घाटी मध्ये काही दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकावर धर्माच्या नावावर गोळ्या झाडून 28 लोकांना मृत्युमुखी पाळले आणि 50 पेक्षा जास्त लोकांना जखमी केले प्रत्यक्षदर्शीने सांगितले की दहशतवादी हे पोलीस च्या वेशात आले होते आणि त्यांनी डायरेक्ट धर्मच विचारलं बस त्यांचे धर्म विचारतात त्यांनी गोळ्या झाडना सुरू केला या हत्याकांडाच्या जाहीर निषेध म्हणून तुमसर शहर मध्ये निषेध रॅली काढण्यात आली आणि या निषेध रॅलीचे रूपांतर निषेध सभांमध्ये झालं यावेळी सर्वांनी आपली दुकाने बंद ठेवली होती आणि हातामध्ये जाहीर निषेध चे फलक घेऊन रॅलीमध्ये सहभाग झाले होते . नगरपरिषद समोर जाहीर निषेध सभा घेण्यात आली आणि प्रतिष्ठित वक्तांनी या घटनेची निंदा करत भाषण दिले ह्यामध्ये माजी खासदार मधुकररावजी कुकडे माजी नगराध्यक्ष प्रदीप जी पडोळे सामाजिक कार्यकर्ता शैलेश मेश्राम , सर्व धर्म, सर्व पक्षीय, सर्व जातीय उपस्थित होत.

