आलापल्ली येथील मामा तलावाचे भाजपा पदाधिकाऱ्याकडून सौंदर्यीकणा ची मागणी..

0
62

त्रिकांत डांगरे शहर प्रतिनिधी आल्लापल्ली 8669198535 – आलापल्ली हे शहर गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव आणी मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी भामरागड रोड बाजूला असलेले मामा तलावाचे खोलीकरणाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ह्या तलावाच्या खोलीकरणामुळे गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते गावात एकही बाग बगीचे नाही,गावातील लोकांना सकाळी फिरण्यास आणि मुलं बाळांना उद्यान नाही. मामा तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यकरणामुळे गावात पाण्याची समस्या आणि सौंदर्यकरण झाल्यास दोन्ही समस्या दूर होईल आलापल्ली शहरांतील तलावचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी मा. ना. अशोकजी उईके साहेब, आदिवासी विकास मंत्री म.रा. यांना भाजपा पदाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले अनेक वर्षापासून मामा तलावात अतिक्रमण धारक अतिक्रमण करून बसले आहे.आलापल्ली शहरांतील मामा तलावाचे अतिक्रमण काढून , पुनर्जीवन करणे व खोलीकरण करुन तलावाचे सौंदर्यीकरण करून. तलावाचा मध्य भागी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा उभारण्यात यांवे. , व पर्यटनदृष्ट्या विकसित करून द्यावी अशी मागणी केली आहे पावसाळ्यात पुर परिस्थिती मुळे तलावाचे पाणी शहरात येवू नये यासाठी संरक्षण भिंत बनवण्यात यावे व पावसाळ्या आधी तलावाचे सर्वप्रथम खोलीकरण करण्यात यावे आदिवासी विकास मंत्री आलापल्ली दौऱ्यात असताना भारतीय जनता पक्षाचे आलापल्ली चे पदाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. आपन यासंबंधी लवकर निर्णय घेऊन पर्यटनदृष्ट्या विकसित करु असा शब्द आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके साहेब यांनी कार्यकर्त्यांना दिला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here