प्रबोधिनी न्युज आमचे
आहे खुपच दर्जेदार
प्रत्येक बातमीला आहे
फक्त प्रेमाचा आधार ।।१।।
प्रत्येक कविता आपली
सूंदर रंगात सजून जाते
म्हणून आपली कविता
खरच काळजाला भिडते ।।२।।
रंग संगती नवी नवी
वाटते नेहमी हवी हवी
म्हणून आपली कविता
खरच प्रबोधीनी न्युज ला द्यावी ।।३।।
प्रबोधिनी न्यूजवर
भेद भाव कधी नसते
प्रत्येकाची कविता ही
घराघरात पोहोचते ।।४।।
प्रशांत सरांचे कार्य
खूप आहे महान
प्रबोधिनी न्युजवर
लावतात कविता छान ।।५।।
प्रबोधिनी न्युजचा
गोडवा वाटे गोड
प्रबोधिनी न्युजला
जगात नाहीच तोड ।।६।।
प्रबोधिनी न्युजची
अशीच व्हावी प्रगती
नेहमीच मिळावे यश
जगात वाढेल कीर्ती ।।७।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

