आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा 7.54 लाखांचा मुद्देमाल जप्त..

0
126

त्रिकांत डांगरे शहर प्रतिनिधी, आल्लापल्ली 8669198535 – अहेरी: तालुक्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक परिसरात आज अहेरी पोलीसांनी मोठी कारवाई करत बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा हस्तगत केला आहे. सदर प्रकरणात रूणाल झोरे (वय ३३ वर्षे, रा. सावरकर चौक, आलापल्ली) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.

ही कारवाई आज दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता पार पडली. आरोपीने वनविभागाच्या पडीक घराचा वापर करून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जमा करून ठेवला होता. त्याच्या विरोधात भारतीय नवसंहितेच्या (BNS) कलम १२३, २७४, २७६, २७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती मनोज शेंडे यांनी दिली.

राज्यात सुगंधित तंबाखू आणि तत्सम पदार्थांवर कठोर बंदी असताना, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात असे प्रकार उघड होत आहेत, हे चिंतेचे कारण ठरत आहे. अशा प्रतिबंधित पदार्थांची तस्करी स्थानिक आरोग्य व कायदा सुव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रूणाल झोरे याच्या मुसकटदाबीसाठी पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अजून कुठलीही टोळी कार्यरत आहे का, याचा तपास देखील सुरू आहे.

१) ६,७३,२०० रुपये किमतीचा हुक्का तंबाखू – ‘मजा १०८’ ब्रँडचे ७२० डब्बे, प्रत्येकी किंमत ९३५ रुपये, १८ चुगल्या

२) १६,४०० रुपये किमतीचा ‘होल्ला’ हुक्का तंबाखू-प्रत्येकी एक किलो वजनाचे २० पाउच, २ चुंगल्या.

३) १२,४०० रुपये किमतीचा ‘ईगल’ हुक्का तंबाखू-प्रत्येकी एक किलो वजनाचे ८ पाउच, प्रति पाउच १५५० रुपये.

४) ५२,९२० रुपये किमतीचा ‘सिग्नेचर फीनेस्ट’ पान मसाला – एकूण ९८ बॉक्स, प्रत्येकी वजन २१६ ग्रॅम.

एकूण मुद्देमालाची किंमत – ७,५४,९२० रुपये

ही कारवाई पो.ह.वा. वंदना डोनारकर (अंमलदार) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार, सपोनि पटले, अहेरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here