जीवघेण्या गर्मी पासून पुढील महिनाभर सुरक्षित राहण्याची गरज.
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – वाशिम : सद्यस्थितीत सुरू असलेल्या मराठी वैशाख आणि इंग्रजी वर्षाचा मे महिना, संपूर्ण महिनाभर अतिशय प्रखरतेने तापणार असून,तिव्र अशा उन्हाचा चांगलाच झटका देवून जाणार अस त्यामुळे विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच नदीनाले विहीरी बोअरवेल्स धरणांच्या पाण्याची पातळी कमी होणार असून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळाची भिषणता जाणवणार आहे.शिवाय अनेक ठिकाणी वृक्ष,जंगले सुकणार असून वनश्वापदांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवणार असल्याचे वास्तव आहे.असे संकेत प्राप्त परिस्थितीनुसार समाजसेवक संजय कडोळे यांनी दिले असून,शासनाने वेळीच दखल घेऊन, पाणी वाचविण्याकरीता आणि येत्या महिन्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी किमान पुढील दिड महिन्यात बांधकामावर बंदी आणण्याची आणि मानवीजीवनासाठी सर्वच गावखेडे आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचे तसेच वनविभागाच्या जंगल क्षेत्रात जंगली श्वापदासाठी पाणवठ्याचे नियोजन करण्याची रास्त मागणी केली आहे. या संदर्भात विशेष वृत्त असे की,विज्ञानाच्या अधीन होऊन,अमर्याद वृक्ष व जंगलतोड,नदी-नाल्यांचे नैसर्गीक प्रवाह वळवीणे आणि बंद पाडणे.रस्त्याच्या आणि निवासांच्या बांधकामा करीता पर्वत पहाडांचे सपाटीकरण करून,निसर्गाचा समतोल बिघडविणाऱ्या मनुष्य प्राण्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास झाल्यामुळे पृथ्वीवरील ऋतुचक्रातच व्यत्यय निर्माण होऊन पाणी,प्राणवायू व अन्नाचा तुटवडा निर्माण होत असल्याचे स्पष्ट दिसत असतांनाही पुढील संकटामधून सावरण्या ऐवजी मनुष्यप्राणी आपल्या आजूबाजूची वृक्षतोड करण्यात आणि जमिनीचे सिमेंटीकरण करण्यातच व्यस्त दिसत आहे. त्यामुळे सध्या दिवसेंदिवस तापमान वाढ आणि वातावरणातील प्रदुषण यामुळे मनुष्य प्राण्याला उन्हाळ्यात जीवन जगणेच कठीण होऊन जात आहे.दिवसाढवळ्या तापमानाचा पार उच्चांक गाठत असून,स्वतःच्या घरात सावलीत असूनही वाढत्या गर्मीने अंगाची लाही लाही होत आहे.जीव मेटाकुटीला येऊन पाणी पाणी करीत आहे.वैशाखात उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याने,नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.उन्हामुळे तिव्र घाम सुटणे,जीव मळमळणे, कासाविस होणे,डोके कान बधीर पडणे,डोळे लाल होणे,डोळ्याची आग होणे किंवा पाणी वहाणे,शौचाला पातळ होणे, चक्कर येणे,अस्वस्थ वाटणे,बेहोश पडणे अशा घटना होऊ शकतात.अशावेळी न घाबरता सर्वप्रथम पांढरा कांदा व भिमसेनी कापूर एकत्र करून त्याचा वास घ्यावा.हातापायाला, छातीला,डोक्याला चोळावे. मिठ साखर पाण्याचे शरबत पिण्यास द्यावे व अजिबात वेळ न दवडता आपल्या फॅमिली डॉक्टरांची भेट घेऊन किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र वा शासकीय रुग्नालयात जाऊन उष्माघात कक्षात उपचार त्यांचे सल्ल्याने उपचार घ्यावेत.उन्हामुळे धरणे,बोअरवेल्स आटणे,रोहित्र जळण्याच्या व इतर घटनांनी विज पुरवठा बंद पडणे,नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद पडणे.आगी लागण्याचे प्रमाण,भरधाव वाहने पेटणे,मोबाईल स्फोट आदी सारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचे घरात सावधानी बाळगावी.अनावश्यक विद्युत उपकरणाचे स्वीच बंद ठेवावे. स्वयंपाक झाल्यावर गॅस सिलेंडर बंद ठेवावे.कुलर,एसी च्या वातानुकूलीत निवासातून किंवा वाहनातून लगेच बाहेर उन्हात जाऊ नये. (वातानुकूलीत वातावरणातून निघाल्यावर अर्धा तास सावलीत थांबून नंतरच घराबाहेर जावे.) उन्हातून आल्याबरोबर लगेच थंडगार पाणी पिऊ नये. (उन्हातून आल्यावर थाडा वेळ थांबून शांततेने पाणी किंवा शितपेय प्यावे.) उन्हातून आल्याबरोबर वातानुकूलीत वातावरणात जाऊ नये किंवा हातपाय धुणे,आंघोळ करु नये.चार पाच दिवस पुरणारा पिण्याच्या पाण्याचा,वापराच्या पाण्याचा साठा भरून ठेवावा.दुपारी भर उन्हात १०:०० ते ०५ : ०० पर्यंत घराबाहेर जाणे टाळावे.थंड पेय लिंबू शरबत, कैरीचं पन्हं,मिठ साखर पाणी,दही,ताक,ऊसाचा रस,नारळपाणी,फ्रूट ज्युस,हलके पातळ अन्न,जेवणात पालेभाज्या घ्याव्यात.द्राक्ष,टरबूज,खरबूज फळे खावी.बेल कॅन्डी,बेलाचा मुरब्बा घ्यावा.हॉटेलची खाद्यपदार्थ,मसालेदार तेलकट पदार्थ,मद्यपान,मांसाहाराचे जेवण टाळावे.घेऊच नये. उन्हाळ्यात पांढरे सुती आणि सैल कपडे वापरावे.डोळ्याला गॉगल आणि शिरस्त्रान म्हणून डोक्याला सुती टोपी,उपरणे, स्कार्फ वापरावा.आपण स्वतः सुरक्षित रहावे व आपल्या समाजातील कुटूंब आणि शेजारीपाजारी व मुख्यतः दिव्यांग आणि वयोवृद्धांच्या प्रकृतीची वारंवार चौकशी व विचारपूस करावी.येत्या संपूर्ण महिनाभर आरोग्याची काळजी घ्यावी.असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.

