गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – आज दिनांक 30/4/2025ला सत्य शिव गुरुदेव सेवा मंडळ घुगुस तफै राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 117 वी जयंती साजरी करण्यात आली. सदर जयंती निमित्त ध्यान पाठ करून गावांतील घाण स्वच्छ करण्यात आले परीसर सूदर करण्यात आले व माणव कायौसाठी त्यांनी केलेल्या कायौची सवौना माहिती देण्यात आली नंतर दुपारी बारा वाजता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व मला अर्पण करण्यात आली व त्यानंतर महाराजांच्या जीवन चरित्रावर श्रीमान निळकंठ जी नांदेसाहेब यांनी प्रबोधनात्मक माहिती सांगितली व नंतर भजनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला व सायंकाळी ठीक पाच वाजता ध्यान प्रार्थना महाआरती व पूजा अर्चा करून महाराजांच्या जयंती ची सांगता करण्यात आली.
सदर जयंती यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, नीलकंठ नांदेड, नंदूची ठेंगणे, व जनार्दन गोवाडे, श्याम वेल तांडा, विठोबा बोबडे, चंद्रगुप्त घागर, गुंडे ज्ञानेश्वर काळे गणेश शेंडे, गणेश वझे, अमोल मांढरे, राजीव काळे, शंकर कामतवार, पंकज बावणे, दीपक पेदोर, पंकज धोटे, मारुती पिंपळकर सर्व गुरुदेव प्रेमीच्या व हस्ते कार्यक्रम साजरा करण्यात आला..

