
मुख्याधिकारी नगरपरिषद घुग्घुस यांना संत श्री. साईबाबा बहुद्देशीय मंडळ यांची मागणी
गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – आज दिनांक 30 4 2025 ला मा. मुख्यधिकारी नगरपरिषद घुग्घुस यांना घुग्घुस येथील मध्यभागी असलेले फार जुने दीक्षित तलाव यांचे सौंदर्यकरण व खोलिकरण करण्यात यावे अशी मागणी संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था घुग्घुस चे अध्यक्ष गणेश शेंडे, उपाध्यक्ष गणेश वझे, सचिव पंकज बावणे, कोशाध्यक्ष शंकर कामतवार, अमोल मांढरे, यांनी व समस्त गावकरी यांच्यावतीने घूगूस नगरपरिषद मुख्यधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली…
मागील अनेक वर्षांपासून घुग्घुस या मध्यभागी असलेले दीक्षित तलाव आहे..

या तलावामध्ये पूर्वी भरपूर पाणी भरून राहायचे व या ठिकाणी दूगौ विसर्जन गणेश जी विसर्जन व नाना प्रकारच्या मूर्तीचे विसर्जन करून पूजा करण्यात येते व तसेच ढिवर भोई समाज बांधव या तलावामध्ये मासोळी शिंगाडे असे पिक घ्यायचं व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते सोबतच कुंभार समाज या तलावाची माती काढून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते परंतु काही महिन्यांपासून या ठिकाणी नाना प्रकारच्या प्लास्टिक कचरा व गावातील घाण आणून टाकले जात आहे त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांना त्वचेचे विकार चामडीचे रोग व डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते आहे भविष्यात खूप मोठा आजार सुद्धा उद्भवू शकते त्याकरिता समस्त गावकरी यांच्यावतीने व संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था घूगूस चे वतीने सदर शासन प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या तलावाचे सौंदर्यकरण व खोलिकरण करण्यात यावे जेणेकरून गावातील पाण्याची पातळी सुद्धा कायम राहणार व तलावा सुद्धा स्वच्छ राहणार व सर्व जनतेला कूठलाच त्रास होणार नाही तरी सदर निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना संत श्री. साईबाबा बहुउद्देशीय संस्था घूगूस चे अध्यक्ष गणेश शेंडे व उपाध्यक्ष गणेश वझे सचिव पंकज बावणे कोशाध्यक्ष शंकर कामतवार अमोल मांढरे व सर्व मान्यवर उपस्थित होते..














