नांदुरा खुर्द गावच्या मूलभूत विकास कामा संदर्भात: भीम आर्मीने दिला २ दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा

0
88

अहमदपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अहमदपूर तालुक्यातील अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेल्या नांदुरा खुर्द गावातील बौद्ध समाजासाठी सवतंत्र सम्शान भूमी बांधून देण्यात यावी.
बौद्ध समाजाचे पूर्वीपासून व पारंपरिक अंतविधी संस्कार किसनराव देशमुख यांच्या शेतात आत्तापर्यन्त करण्यात आला आहे व या ठिकाणी सम्शानभूमी बांधून (सुशोभीकरण)करून बांधून देण्यात यावी.
बौद्ध व लमाणी सम्शानभूमिकडे जाण्यासाठी नदी पार करून जावं लागतं आहे तर त्या ठिकाणी पुल बांधून ( बांधकाम ) करून देण्यात यावे.तसेच नदीचे खोलीकरण करून देण्यात यावे.
बौद्ध वस्तीत दिवा बत्ती /सोलार लाईट बसवण्यात यावे तसेच 10 पोल देण्यात रोवण्यात यावे.
गावाकऱ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून दोन आरो मशीन मोटार बसून देण्यात यावे डॉ बाबासाहेब आंबेडकर सास्कृतिक सभागृहसाठी जागा देण्यात यावी.
डॉक्टर च्या शेतापासून ते गावात जाणारा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावे आशयाचे निवेदन भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे याचे नेतृत्वात अहमदपूर चे तहसीलदार याचे कडे देण्यात आले होते .तरी या संदर्भात कसलीच कार्यवाही झाली नसल्याने दिनांक२९ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा स्मरण पत्र देत ५मे२०२५ रोजी धरणे आंदोलन कण्याचे निवेदनाद्वारे अहमदपूरचे तहसीलदार व.अहमदपूर पोलीस अधिकारी यांना कळवले आहे यावेळी भीम आर्मीचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष लातूर लक्ष्मण कांबळे, भीम आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, भीम आर्मी अहमदपूर तालुका अध्यक्ष अफसर भाई शेख आदी पदाधिकारी हजर होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here