डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर तालुक्यातील आलेसुर गावाचे होणारे नवरदेव राहुल काशीराम राऊत या तरुणाचे नाव आहे .आज दिनांक 30/4/2025 ला सायंकाळी लग्न होणार होते .सध्या मुलीचे गाव आणि नाव हे लपवून ठेवण्यात आले कारण बदनामी होऊ नये म्हणून राहून दिनांक 28/4/25 ला सकाळी पाच वाजता घरून निघून गेला. घरच्या लोकांनी फार शोधा शोध केली पण राहुल बेपत्ता झाला.दिनांक 30 तारखेला लग्न असल्यावर फार कसून शोध घेण्यात आला.जेव्हा तो सापडला नाही अखेर चा काळात वर पक्षाने गोबरवाई पोलीस स्टेशनला आपल्या मुलाची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता होण्याचे कारण समजू शकले नाही. मुलीच्या कुटुंबाला संपूर्ण प्रकरण कळविण्यात आले. पुढील तपास गोबरवाही पोलीस प्रभारी शरद शेवाळे करीत आहे.

