काँग्रेसचा समर्थन व पाठींबा
गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे निर्माण करण्यात आलेले आहेत.
या रेल्वे उड्डाणपुलाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी श्री सत्यशीव गुरुदेव सेवा मंडळा तर्फे करण्यात आलेली आहे.
या मागणीला घुग्घूस शहर काँग्रेसतर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर व संपूर्ण काँग्रेस पक्षाने आपला समर्थन व पाठिंबा दिलेला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे देशालाच देव मानणारे माणसात देव शोधणारे गरजूना मदत करणारे आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी, जाती धर्म पंथ भेद, मादक पदार्थ यावर जागृती करायचे समाजघातक गोष्टीवर प्रहार करायचे ते स्वातंत्र्य विर होते.
त्यांनी येणाऱ्या पिढीसाठी राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखविणारे ग्रामगितेचा आदर्श पुढे ठेवलेला आहे.
अश्या महामानवाच्या नावावरच या उड्डाणपुलाचे नाव झालेच पाहिजेत यासाठी आम्ही सत्यशीव गुरुदेव सेवा मंडळाच्या सदैव पाठीशी राहू असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सत्यशीव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकरजी मालेकर व सत्यशीव गुरुदेव मंडळाचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलीम शेख, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

