कोपरगाव येथील सचिन वाच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा अखेर उघड किस आला….

0
82

नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी

संपूर्ण माहिती अशी की फिर्यादी संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वार रोड कोपरगाव यांचे कोपरगाव शहरांमध्ये सचिन वॉच कंपनीचे घड्याळाचे मोठे दुकान आहे. फिर्यादी हे दिनांक 18 4 2025 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळे घरफोडी करून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दुकानफोडीचा गुन्हा दाखल आहे. माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस अन्यबाबत आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात. पोलिसांबलदार गणेश भिंगारदे. अशोक लिपणे प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थोरात रमेश राजा आत्तार अमृत आढाव फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे अशांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. दिनांक 30 4 25 रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जय मंगलदास राहणार घोडा सहन बिहार व त्याचे इतर सात साथीदार यांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली पतखाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयतांचा शोध घेऊन सुरेंद्र जय मंगलदास वैशालीस रियाज नईम अन्सारी वय 40 पप्पू विंदा गोसावी वय 44 राजकुमार चंदन साह वय 20 राजू कुमार बिरा प्रसाद वय 45 नई मुन्ना देवान वय 30 राहुल कुमार किशोर प्रसाद वै 26 गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय 25 हे सर्व राहणार घोडा सहन तालुका घोडा सहन जिल्हा मोतीहारी राज्य बिहार अशी आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात पथकाला यश आले व पथकाने पंचायत समक्ष आरोपींना ताब्यात घेऊन अंग जडती घेऊन त्यांच्याकडून 981,000/रुपये किमतीचे त्यात टायटन रागा टायटन. टाइम एक्स कंपनीची 100 घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा एकूण 10,62,000/ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी केलेल्या मागील गुन्ह्याची सविस्तर माहिती त्यांच्याकडून विचारपूस करून घेतली. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर .श्री वैभव कल्लू वमे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर. गिरीश वमने उपविभागीय पोलीस अधिकारी .यांनी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here