अद्यन्यात वाहनाचा धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू तर पती जखमी, चार मुलींचे मायेची ममता हिरावले.

0
113

विवेक मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
8830554583

अहेरी तालुक्यातील राजापूर पॅच येथील रहिवासी संजय बाला येलेलवार व कमला संजय येलेलवार हे भोई समाजातील एक घटक असल्याने त्यांच्या व्यवसाय मासेमारी करून मासे विक्री करणे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायाद्वारे चालवणे.

कमला येलेवार व संजय येलेलवार यांना कल्याणी,मोनिका,रेखा,व श्रृती असे चार मुली आहेत. संजय हा गोर गरिबी सामान्य कुटुंबातील असल्याने तो शेती व मोल मजूरी करायचा आणी त्याची पत्नी आठवडी बाजारात मासे विक्री करायची सद्या उन्हाचा पारा वाढल्याने संजय आपल्या पत्नीला MH-33-AB-3203 या दुचाकी ने मासे विक्री करीता बोरी येथून अहेरी येथे असलेल्या आठवळी बाजाराला जात होते मात्र एका अज्ञात वाहनाने बोरी येथे असलेल्या दिना नदि जवळ संजय येलेलवार यांच्या दुचाकी ला मागून जबर धडक दिल्याने कमला संजय येलेलवार रा.राजपुर (३७) हिचा जागीच मृत्यू झाला तर संजय बाला येलेलवार हा किरकोळ जखमी झाला आईचा मृत्यू झाला असे मुलिंना कळले असता त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळाला आणी मुलीवरची मायेची ममता सुद्धा हिरावले.
सदर घटनेची माहिती बोरी व राजपूर पॅच येथील नागरीकांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटने बद्दल रोष व्यक्त केला यावेळी अहेरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक स्वप्नील इजपवार व त्यांच्या चमुंनी नागरीकांमध्ये असलेला रोष कमी केला व सदर घटनेची सखोल चौकशी करून अज्ञात वाहनधारकार कठोर कारवाई करू असे सांगितले पुढिल घटनेचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील इजपवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलीस करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here