गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या (AIYF) 17व्या राज्य अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्याचे संघर्षशील युवक नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अमरावती येथे नुकतेच पार पडलेले हे अधिवेशन महाराष्ट्रातील युवक चळवळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे ठरले.
कॉ. सचिन मोतकुरवार हे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी, दलित, वंचित, विद्यार्थी व युवकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरून लढणारे, संघटनात्मक बांधणी करणारे, आणि भांडवली व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे एक निडर कार्यकर्ते आहेत. त्यांनी AISF, AIKS व CPI च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.
राज्य कार्यकारिणीतील अन्य निवडणुका: राज्याध्यक्ष: कॉ. आरती रेडेकर (कोल्हापूर), सचिव: कॉ. सागर दुर्योधन (अमरावती), उपाध्यक्ष: कॉ. विकास गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), कॉ. सचिन मोतकुरवार (गडचिरोली), सह सचिव: नयन गायकवाड (अकोला), कोषाध्यक्ष: कॉ. इकबाल हुसैन खान (ठाणे), कॉ. सचिन मोतकुरवार यांची ही निवड म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या संघर्षाला मिळालेली राज्यस्तरीय पावती आहे. युवकांचे प्रश्न, शिक्षणातील अन्याय, बेरोजगारी, सामाजिक विषमता याविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका ही आजच्या काळात प्रेरणादायी ठरते.
AIYF महाराष्ट्र राज्याच्या या नव्या नेतृत्वाकडून आगामी काळात प्रगतिशील, परिवर्तनवादी युवक चळवळीची नवी दिशा अपेक्षित आहे.

