जेष्ठ पत्रकार ज्योती बंडूपंत हंगे यांना महाराष्ट्र साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार ने सन्मानित 2025 च्या ठरल्या मानकरी

0
70

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक ३/५/२०२५ रोजी संस्थापक अध्यक्ष. मा. सुदाम संसारे, ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२५ हा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार. राष्ट्रीय पातळीवरील वैजापूर च्या ज्योती हंगे जेष्ठ पत्रकार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज च्या उत्तर प्रदेश अध्यक्ष यांना महाराष्ट्र साई कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये एकूण १७५ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील साई च्या नावाने व साईच्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत पुरस्कार व मानाचा फेटा. गोल्डमेडल. ट्रॉफी व साई बाबा चीफ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार मानाचा,सन्मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो. या पुरस्कार साठी संपुर्ण महाराष्ट्र ३६ जिल्ह्याचे नामांकित व सामाजिक क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज च्या हस्ते व प्रधान करण्यात आला आहे ठिक १०.वाजता शिर्डीत हाॅटेल शांतीकमल या थ्री स्टार हॉटेल मध्ये संपन्न झाला. आहे. या पुरस्कार सोहळ्यास एकुण ३६.प्रकारच्या विविध क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८१.मान्यवरांना कलारत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत मा.अभिनेत्री.मानसी नाईक,मा.समाज सेवक. श्री.किशोरजी कालडा संगमनेर,मा .समाजभूषण. श्री.उत्तम काका घोगरे पाटील. लोणी प्रवरा,मा.प्राचार्य. डाॅ..अरुण गायकवाड. संगमनेर काॅलेज,मा.निर्माता. श्री.नरोत्तम कुमार फहिमा चेअरमन. हैदराबाद,मा.श्री.मुकेश ओबेरॉय. एम.डी.ॲनाॅन फार्मा
नाशिक,मा.मिमिक्री कार. श्री.अशिष सातपुते,मा.निर्माता व दिग्दर्शक. श्री.अल्ताफ शेख.,मा.विजय खुरपे.चंद्रमा फाऊंडेशन चेंबूर. मुंबई,मा.प्रोफेसर. डाॅ.सुरेश गुडदे.संगमनेर काॅलेज. मा.प्रोफेसर.डाॅ.जितेंद्र पाटील .संगमनेर काॅलेज. मा.शिक्षण सम्राट. डाॅ.दतात्रय वाणी.प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था गणेगाव. राहुरी.तरी या सुवर्ण संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा हा पुरस्कार सोहळा सुवर्ण अक संस्थापक अध्यक्ष. मा.श्री.सुदाम संसारे.सर यांनी सांगितले.पुरस्कार संपल्या नंतर लगेच एक आगळा वेगळा लक्की ड्राॅ.चा कार्यक्रम करण्यात आला. या मध्ये १२ भाग्यवान महिलांना.१२ पैठणी साड्या सप्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याच प्रमाणे पुरुषा मधुन १२ भाग्यवान पुरुषांना प्रत्येकी एक पॅन्ट पीस व एक शर्ट पीस.सप्रेम भेट म्हणून देण्यात आले तसेच स्वागत अध्यक्ष सौ. राजनंदनी संतोष अहिरे व समाज सेवक. यांनी हि या कार्यक्रमाची मोठी जबाबदारी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here