सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दिनांक 12 मे 2025 रोजी हवेली गार्डन मित्र परिवारातर्फे संगीतमय बुद्ध पहाट आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच संविधानाच्या पुस्तकांचे वितरण करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून मान अनंत बाबरे ऑल इंडिया समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष, मान. प्रगती मेश्राम केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा, मान. मंगेश खोब्रागडे, सुदेश भालेकर निर्माता हद्द 2, मान सुविद्या बांबोळे प्रबोधिनी न्युज च्या विदर्भ संपादीका उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान. प्रज्योत नळे , भरणे साहेब यांनी केले.
बुद्ध पहाट संगीतमय कार्यक्रमाचे गायक प्रणित उराडे, रोहित भगत, विक्की गोलेटकर, शिल्पा पागडे, रत्नपारखी, सारिका भालेकर होते.. हवेली गार्डन मित्र परिवारातर्फे आयोजन करण्यात आले त्यात करून आनंद, आनंद कांबळे, योगानंद डोंगरे, चालखुरे, तेजस दुर्गे यांनी अथक प्रयत्न केले..

