मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांची २५६९ वी जयंती नालंदा बौद्ध विहार सिमलानगर रजि.मलबार हिल निपियनसी रोड मुंबई येथे नालंदा बौद्ध सेवा संघ रजि. अध्यक्ष समाजभूषण बौदाचार्य सो.ना.कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
प्रथमत: बुद्ध वंदना पूजापाठ करून मलबारहिल पोलीस ठाण्याचे सिनियर श्री उदयसिंग शिंगाडे यांच्या मार्गदर्शनातून ए पी आय श्री राहूल धुमाळ, श्री अशिष घोरपडे,श्री विनायक गुठे,श्री संतोष नागापूरे पोलीस शिपाई यांच्यासह जयंती कार्यक्रमाचे आयोजक नालंदा बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस आयु.बापु गायकवाड गुरुजी अतनुरकर, आयु.सिध्दार्थ जगताप आदिने तथागत भगवान गौतम बुद्ध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावे वंदन करून बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छापर मार्गदर्शन केले.
समाजभूषण बौदाचार्य आयु.सो.ना.कांबळे आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,ज्यानी बुद्ध विचार स्वीकारले व अंगिकारले त्यांनाच खऱ्या अर्थाने बुद्ध कळाले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हास बुद्ध कळाले,
बुद्ध विचाराकडे आमचे मन वळाले! मनुवादी अंधश्रद्धेवरील आमच्यातले विचार आपोआप पळाले!
म्हणूनच आपले खऱ्या अर्थानी जीवनाचे सोने झाले!
“जगात शांतता नांदायची असेल तर आणि मानवी जीवन सुखी करायचे असेल तर बुद्ध विचाराशिवाय इतर कोणता ही पर्याय नाही” असे ठणकावून सांगून “जगाला युध्द नको बुद्ध हवा शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म विचार हवा” असे सो.ना. कांबळे यांनी प्रतिपादन करून पुढे आपल्या प्रवचनात म्हणाले की,”वैशाखी पौर्णिमा” ही अंत्यत महत्वाची पौर्णिमा आहे जगाच्या दृष्टिने तिचे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, याच दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला,सम्यक संबोधी प्राप्त करून याच दिवशी सम्यक संबुध्दांचा जन्म झाला विश्वाला बुद्ध मिळाले,तसेच बुद्धांचे महापरिनिर्वाण देखील वैशाख पौर्णिमेला झाले, त्यामुळे बौद्ध विश्वात वैशाखी पौर्णिमेला “बुद्ध पौर्णिमा” नाव हे अजरामर झाल्याचे बुद्ध पौर्णिमेचे क्रांतिकारक महत्त्व कांबळे यांनी बुद्ध जयंतीनिमित्त प्रवचनात सांगितले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन बापू गायकवाड गुरुजी यांनी केले बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी सर्व सिद्धार्थ जगताप,दिपक लामतुरे,सौ रुपाली रवी धबाले,श्रीम चांगुनाबाई रघुनाथ लामतुरे,श्रीम विमल अशोक ससाणे,आदिने परिश्रम घेतल्याचे सिमलानगर नालंदा बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष समाजभूषण सो.ना.कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

