प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरर्णी मूल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुजित गुलचंद खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
सुजीत खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगेश पोटवार हे पत्रकार असल्याची बतावणी करून वारंवार जाहीरातीसाठी त्रास देतात. टेकाडी येथील सौरउर्जेवर आधारीत बोरवेलचे काम यांचे जावईयाच्या नावाने आहे, आणि त्या कामाची माहीती मागण्याकरीता आरटीआय दाखल केल्यामुळे ते माझेवर चिडून होते. माझे टुरिस्ट वाहन नागपूर रोडवरील गॅरेजमध्ये दुरूस्ती करण्याकरीता मी गेलो असता, तेथे मंगेश पोटवार यांनी मला तु माझे जावयाच्या कामाची माहीत मागुन, लोकांना पुरवित आहे म्हणुन अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार खोब्रागडे दिनांक 8 मे रोजी मूल पोलिसांना दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे विविध कलमान्वये मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

