हवेली गार्डन परिसरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी

0
70

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – आज दिनांक 12 मे 2025 त्रिरत्न सम्यक संबोधी बहुउद्देशीय महिला मंडळ हवेली गार्डन, चंद्रपूरच्या वतीने बुद्ध जयंतीचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात घेण्यात आला. पहिल्या सत्रात सकाळी नऊ वाजता बुद्ध वंदना व मान्यवराची भाषणे घेण्यात आली. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन मान. सुरेखा पथाडे आणि मान. बिना मुंजनकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. लगेच पाहुण्यांची भाषणे घेण्यात आली. माननीय मनोहर साखरे आणि माननीय उमरे साहेब यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन बुद्ध पौर्णिमा विषयी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमानंतर लगेचच सर्व उपस्थित बौद्ध उपासक आणि उपासिका यांना नाश्ता व खीर चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मान. राजानंद दुधे यांनी केले. अशा प्रकारे सकाळचा कार्यक्रम घेण्यात आला.
दुसऱ्या सत्रात सायंकाळी ठीक 6.00 वाजता वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्य तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मान.कल्पना बुरचुंडे, मान. सपना कांबळे व मान. दिशमा रामटेके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर लगेच सामूहिक बुद्ध वंदना व त्रिशरण घेण्यात आले. त्यानंतर माननीय कवरासे व त्यांची टीम च्या वतीने बुद्ध व भीम गीते चा कार्यक्रम घेण्यात आला.
रात्री ठीक 7.00 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली. अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये, संगीतमय वातावरणामध्ये बुद्ध व भीम गीते कवरासे सर आणि त्यांच्या सर्व टीम यांनी सादर केले. त्यामध्ये ऑक्टोपॅड मान. संदीप मंडल, कीबोर्ड मान. मुकेश कुमार, तबला वादक मान. सतीश कवरासे आणि बुद्ध व भीम गीते गाण्यासाठी गायक मान. संजय माशीरकर, मान.अमर घिराले, मान.प्रिया मंडल व कुमार अथर्व कवरासे तसेच मा. अविनाश जुमडे यांनी सुंदर असा तीन तास कार्यक्रम आपल्या प्रबोधनातून भीम गीते व बुद्ध गीते चा कार्यक्रम अतिशय थाटामाटात सादर केला. सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका अतिशय आनंदाने सर्व गाणे ऐकत होते. नंतर कार्यक्रम चालू असताना 9.30 वाजता रात्रीचे अल्पोहार मसाला भात व कळी उपस्थित सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम थाटामाटात हवेली गार्डन, धम्म ध्वजाजवळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान. दुधे सर व पाहुण्यांचे आभार मान. प्राध्यापक मुंजनकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी त्रिरत्न सम्यक संबोधी बहुउद्देशीय महिला मंडळ तसेच पुरुष मंडळ येथील सर्व सदस्य गण आणि हवेली गाडीत गार्डन परिसरातील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here