prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूरमध्ये समता विकास मंडळाच्या बुद्धविहार वास्तूचे भव्य उद्घाटन

चंद्रपूरमध्ये समता विकास मंडळाच्या बुद्धविहार वास्तूचे भव्य उद्घाटन

0
295

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर आज १२ मे २०२५ – पंचशील चौक, चंद्रपूर येथे समता विकास मंडळाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्धविहार वास्तूचे भव्य उद्घाटन आज बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनी मंडळाचे संस्थापक सचिव मा. श्रीहरी रामटेके आणि संस्थापक कोषाध्यक्ष मा. गंगाधर भगतकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

बुद्धविहार हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते समाजजीवनाला दिशा देणारे, समतेची शिकवण देणारे आणि विचारांचे अधिष्ठान असते. हे लक्षात घेता नव्या वास्तूमध्ये सुसज्ज वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. हे वाचनालय ज्ञानार्जनाचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे.

या नव्या वास्तूच्या माध्यमातून समता, शांती व धम्मविचारांचे बीज नव्या पिढीत रोवले जातील, असा विश्वास मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. समता विकास मंडळाने एक सामाजिक बांधिलकी जपत उभारलेली ही वास्तू भविष्यात संविधानिक मूल्यांचे व बुद्धविचारांचे केंद्र म्हणून विकसित होईल, असे उपस्थितांनी नमूद केले.

उद्घाटनप्रसंगी समता सैनिक दलातर्फे भगवान बुद्धांना शांतीपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. या सोहळ्याला परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, नागरिक, आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला समता विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन रामटेके, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अनंत बाबरे, समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. बंडू रामटेके, प्रजेश घडसे, समता विकास मंडळाचे सचिव पराग चुनारकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन चांदेकर, कुणाल रामटेके, परिमल रामटेके, राहुल रामटेके, शांतीसागर भगतकर, अमर रामटेके, सचिन रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समता विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि उपासक व उपसिका यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here