वाढदिवस आज तुझा
दिन हा सौख्यांचा
स्वप्नं होवो साकार
न येवो क्षण दुःखाचा….
हसत खेळत रहावीस तु
माझ्या भावाच्या जीवनात
आनंदाला उधाण येवो
तुम्हा दोघांच्या आयुष्यात…
स्वप्नं व्हावेत सर्व पुर्ण
घ्यावीस उंच भरारी
सुख, समृद्धी, आरोग्य
लाभो तुला जीवनी…
आजच्या या शुभ दिनी तु
फुलाप्रमाणे बहरावीस
सुखाला घेऊन कवेत
सुगंधाप्रमाणे दरवळावीस…
सोनेरी या दिवसाला
सुंदर क्षणानी व्यापावे
आयुष्याला तुझ्या भरभरून
सर्वांचे आशीर्वाद लाभावे….
सीमा गाडेकर
यवतमाळ
.

