प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वाढदिवसा निमित्ताने कविता – कीर्तीवंत होऊ दे आयुष्य

0
74

प्रबोधिनी मंचच्या सदस्या
नम्रता दिदीच्या जन्मदिनी
शुभेच्छा देतो मी दिदीला
आभाळभर काव्यरचनेतूनी

प्रबोधिनी समुहातील सक्रिय
नम्रता दिदी अतिशय गुणी
उच्च विचार साधी राहणी
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची धनी

असेच व्हावे जन्माचे सोहळे
व्यक्तीमत्व उत्तरोत्तर बहराव
जन्मदिनाच्या मंगल कामना
जीवन सारं आनंददायी व्हावं

पुढील यशस्वी वाटचालीस
निरोगी मिळो दिर्घायुष्य
आनंदी सुखी भरभराटीच
कीर्तीवंत होऊ दे आयुष्य

कवी:उमेश बाऱ्हाटे
पुर्णा जिल्हा परभणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here