प्रा. प्रितम माकोडे तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- मोहाडी:दिनांक 14 मे 2025 रोजी शिवश्री शामदादा कोसरे व शिवमती भाग्यश्री यांचा लग्न सोहळा रामटेक येथे पार पडला. त्या अनुषंगाने दिनांक 15 मे 2025 रोजी शिवश्री शामदादा कोसरे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड भंडारा यांचा स्वागत समारंभ शिवधर्म पद्धतीने साजरा करण्यात आला. स्वागत समारंभाचे औचित्य साधून ग्राम धुसाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवकथा वाचन करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता नव वधु व वराचे स्वागत समारंभ स्थळी आगमन होताच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना व शिवगर्जना घेऊन करण्यात आली.
नव वधु व वराला शिवाशिर्वाद देत असताना मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अनिल भुसारी, जिल्हाध्यक्ष शिवश्री चंद्रकांत लांजेवार, जिल्हा सचिव शिवश्री अनिल झंझाड, मोहाडी तालुकाध्यक्ष शिवश्री प्रितम माकोडे, शिवश्री दिपक बांते, शिवश्री शिशुपाल भुरे संभाजी ब्रिगेड भंडारा, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव शिवश्री गणेश नंदनवार, शिवश्री विजय बालपांडे, तुमसर तालुकाध्यक्ष शिवश्री नाना ठवकर, शिवश्री संजय बडवाईक तथा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड भंडारा चे सदस्य उपस्थित होते.

