prabodhini news logo
Home ठळक बातम्या कु. सायली ढेबे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर

कु. सायली ढेबे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर

0
120

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ यंदा कु. सायली बाळू ढेबे यांना देण्यात आला. पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र, कलाक्षेत्र, साहित्यिका, लेखिका, उत्कृष्ट वक्त्या, स्व आत्मपरीक्षण व्याख्याने, अशा अष्टपैलूत पारंगत असलेल्या महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळ्याच्या त्या मानकरी ठरल्या.हा सोहळा २५ मे रोजी,निर्मिती लॉन्स,विजापूर रोड, जुळे सोलापूर येथे पार पडणार आहे.
अशोक गोरड (अध्यक्ष, ए.डी. फॉउंडेशन), महादेव महानूर (कार्याध्यक्ष)यांनी ३००व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुरस्काराची घोषणा केली. मा.आ. प्रकाश शेंडगे (माजी आमदार), मा.डॉ. नितीन वाघमोटे (आयकर आयुक्त, पुणे ), मा.डॉ. सचिन मोटे ( आयकर आयुक्त, मुंबई ) यांची उपस्थिती पुरस्कारास असणार आहे. त्याचबरोबर विशेष उपस्थिती मा. चिमण डांगे, चेतन नरोटे ( धनगर समाज नेते), रुख्मिणी गलांडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे), राम मांडूरके ( सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे), मा. आ. उत्तमराव जानकर (माळशिरस विधानसभा), मा. आ. बाबासाहेब देशमुख (सांगोता, विधानसभा), मा. आ. नारायण आबा पाटील (करमाळा विधानसभा), डॉ.प्रा. यशपाल भिंगे, मा. अनिल जाहीर, प्रा. घनश्याम चौगुले, तुकाराम पाटील, श्वेता परदेसी, श्रीमती प्राजक्ता मालुंजकर असे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here