prabodhini news logo
Home चंद्रपूर बाबुपेठ वियानी पब्लिक स्कुलचा १००% निकाल

बाबुपेठ वियानी पब्लिक स्कुलचा १००% निकाल

0
157

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बाबुपेठ वियानी पब्लिक स्कुल, चंद्रपूरचा विद्यार्थ्यानी यशाची उज्वल परंपरा कायम राखत नेहमीप्रमाणेच नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाचा (SSC) मार्च २०२४-२०२५ परीक्षेत घवघवीत यश मिळवून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून एकूण १८ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यापैकी २ विद्यार्थ्यानी ८७% वर गुण संपादन केलेले आहेत. त्यात कुमारी प्रणती रवी कोमल्ला या विद्यार्थ्यानीने ८७.६०% गुण संपादन करून शाळेतून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तसेच कुमार शंतनु सिद्धार्थ दुधे ८७,४०% कुमारी मानसी विलास कासारे ८४.८०% या विद्यार्थ्यानी गुण संपादन केले आहे.
शाळेचे माननीय मुख्याध्यापक फा. फ्रान्सिस मिंज व उपमुख्याध्यापका मदर स्मिता व सर्व शिक्षकवृदांनी सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here