आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश
३२ हातपंप बसविण्यासाठी ६९.६० लाखांची प्रशासकीय मान्यता
नागरिकांनी मानले आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
बल्लारपूर प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १६ – उन्हाच्या तीव्र तडाख्यात पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये हातपंप बसविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ३२ नवीन हातपंप मंजुर झाले असून याकरिता एकूण ६९ लक्ष ६० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे, नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

