prabodhini news logo
Home चंद्रपूर दुर्गापूर बस थांब्यावर प्रवास्यांकरिता नवीन शेड बांधकामासाठी जागा निश्चित.

दुर्गापूर बस थांब्यावर प्रवास्यांकरिता नवीन शेड बांधकामासाठी जागा निश्चित.

0
99

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा. उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी केली प्रत्यक्ष पाहणी.

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – दुर्गापूर : ताडोबा रोड दुर्गापूर येथील चंदुबाबा गेट समोर चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत केंद्राच्या सुरक्षा भिंतीलगत असलेल्या बस स्टॅन्डच्या जागेवर प्रवाशांकरीता १ शेड होते. सदर मार्गावर जवळपास १० हुन अधिक गावे असल्याने व त्यांच्या सोयीने दुर्गापूर हे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे दररोज शेकडो नागरीक दुर्गापूर येथे येत असतात. तसेच या परीसरालगत असलेल्या गावातील शेकडो विद्यार्थी देखील दुर्गापूर येथील शाळेत शिक्षणाकरीता येत असतात. हे संपुर्ण नागरीक व विद्यार्थी शासनाच्या बसने व ऑटोने प्रवास करीत असतात. या मार्गावर चंदु बाबा गेट समोर बस व ऑटोकरीता मुख्य थांबा आहे.

या कारणाने चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्राच्या सुरक्षा भिंती लगत या सर्व प्रवाशांकरीता शेड होते त्या शेडच्या सावलीत हे प्रवासी व विद्यार्थी थांबत होते. या शेडमुळे ऊन व पावसापासुन यांचा सर्वांचा बचाव होत होता. परंतु मागील ६ महिन्यापुर्वी हा शेड काढण्यात आला असल्याने या सर्व प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे .

आता या सर्व प्रवासी व दररोज शेकडो विद्यार्थ्यांना तासनतास रस्त्यावर उभे राहावे लागते. अनेकदा येथील वाहतूकीमुळे विद्यार्थ्यांचे किरकोळ अपघात देखील झाले. व म्हणून या सर्वांच्या सुरक्षितता व सोईच्या दृष्टीने तात्काळ या रस्त्यावर मुख्य बस थांब्याच्या ठिकाणी शेडचे बांधकाम करण्यात यावे याकरीता दिनांक १७ मार्च २०२५ व १५ एप्रिल २०२५ ला मा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ यांचेकडे स्वयंस्पष्ट लेखी निवेदन दिले व त्याबाबत महत्व लक्ष्यात आणून दिले.

त्याअनुषंगाने या जागेची सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा. उपकार्यकारी अभियंता व मा. कनिष्ठ अभियंता यांनी बस थांब्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चिती केली व त्याबाबत लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, कामगार जिल्हाध्यक्ष संजय सेजुल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर गोमासे, ग्रामपंचायत सदस्य सुमेघ मेश्राम, नितीन रत्नपारखी, आशिष ठक्कर, राकेश रेपल्लीवार, आकाश बंडीवार, रोशन ढवळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here