prabodhini news logo
Home घुग्घुस राजीव रतन चौकात नेहमी वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे ती समस्या लवकरात लवकर...

राजीव रतन चौकात नेहमी वाहतूकीची कोंडी होत असल्यामुळे ती समस्या लवकरात लवकर सोडवावी

0
127

महिला काँग्रेस घुगुसची प्रशासनाला मागणी

गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – येथिल राजिव रतन चौक जवळ दररोज दोन ते तीन तास ट्राफिक जाम होते आणि ते नेहमीच झाले आहे या ट्रॅफिक ज्यामुळे कित्येकदा रुग्णवाहिकेतून पेशंट नेताना मरण सूदधा पावले व पुष्कळ रुग्णांचे जीव सुद्धा गेलेले आहे कित्येकाचे अपघात होऊन हात पाय सुद्धा तुटले आहे म्हणून ही समस्या लवकरात लवकर प्रशासनाने मार्गी लावावी याकरिता महिला काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले रेल्वे उड्डाण पूलाचया कामामुळे घुगुस येथील रेल्वे मार्गावरील जी 39 गेट नेहमी बंद राहते व त्यामुळे घुगुस येथील रस्त्यावर जड वाहनाबरोबर चार चाकी दुचाकी वाहनाच्या लांबत लांब रागा लागतात यामुळे या मार्गावर दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होते व वाहन चालकांना नेहमी ताटकळत बसावे लागते व बेशिस्तपणे जाणाऱ्या जड वाहनांना वर दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई करावी व वाहतूक नेहमी सुरळीत करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे अशी मागणी शहर महिला काँग्रेस तर्फे चे ठाणेदार प्रकाश राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी निवेदन देताना जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव पद्मा त्रिवेणी दुर्गा पाटील ज्येष्ठ नेत्या संध्या मंडळ मंगला बुरांडे सुगंधा दोमा दुर्गम्मा आरती व पुष्कळच्या महिला उपस्थित होत्या करिता लवकरात लवकर प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here